पुणे : पुण्याच्या बालेवाडी येथील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या अपघातात ८ जण जागीच ठार झालेत. तर अनेक जण गंभीर जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. १४व्या मजल्यावर स्लॅबचे काम सुरु असताना हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की अनेक मजूर १४व्या मजल्यावरुन खाली फेकले गेले. 


या अपघातात अनेक मजूर अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळतात तातडीने स्थानिकांनी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.