उल्हासनगर : उल्हासनगर इथं एका पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एकाला आपला जीव गमवावा लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर कॅम्प - 3 येथील सपना गार्डन जवळील सिंधरी सागर इमारतीचा स्लॅब कोसळला. ही इमारत पाच मजल्यांची असून या इमारतीचे आतील भागातील चार स्लॅब अचानक कोसळले. 


या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख मनोहर कामरा (वय 65) अशी पटलीय. कामरा कुटुंबीय तळ मजल्यावरील रुम नंबर 103 मध्ये राहत होते. या इमारतीत एकूण 12 फ्लॅट असून ही इमारत खाली करण्यात आली आहे.


उल्लेखनीय म्हणजे, ही इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हतीच. या इमारतीच्या कोसळलेल्या मलब्याखाली खाली दोन चार चाकी गाड्या दाबल्या आहेत.


बातमी मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दल आणि पालिकेचे कर्मचारी पोहचले असून मदतकार्याला सुरुवात झालीय. शनिवारी या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट केलं जाणार आहे.