उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वेस्टेशनबाहेर मध्यरात्री गुंडांनी धुडगुस घातला. १५ ते २० जण हत्यारं घेऊन स्टेशनबाहेरच्या  रिक्षा, एक अल्टो आणि एका एक्टिव्हाची तोडफोड केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विठ्ठ्लवाडी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आलीय. या घटनेनंतर रिक्षाचालकांनी संप पुकारलाय. 


आरोपींना अटक करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केलीय. शिवाय स्टेशन परिसरात २४ तास पोलीस बंदोबस्ताचीही मागणी केलीय.