अकोला : शहरातल्या गोरक्षण भागामधल्या विजय हाऊसिंग सोसायटीच्या सर्व्हिस गल्लीत, हजार  आणि पाचशेच्या नोटा  जाळलेल्या स्थितीत आढळून आल्या. या ठिकाणी कचरा वेचणा-या महिलेला काहीतरी जळत असल्याचं दिसलं. तिने जवळ जाऊन पाहिलं असता त्या हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा असल्याचं तिच्या लक्षात आलं.


विशेष म्हणजे या सर्व्हीस गल्लीत तीन ठिकाणी नोटांना आग लावून त्या जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी या नोटा जप्त केल्यात. जाळलेल्या नोटांची रक्कम वीस लाखांवर असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.