नाशिक : नाशिकच्या मुंबई  आग्रा महामार्गावर  आडगाव जवळ बस आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला असून कंटेनर रस्त्यावर पलटी झालाय तर एसटी बस निम्याहून अधिक चिरली गेलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात सहा ते सात जण जखमी झाले असून गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.   


सायंकाळच्या  सुमारास हा अपघात घडलाय. आडगाव गावातून एस टी बस महामार्गावर येत असताना ओझर गावाकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारा कंटेनर बसवर आदळला या जोरदार धडकेमुळे  कंटेनर रस्त्यावर पलटला तर बसचे मोठ नुकसान झालाय. 


सुदैवाने या कुठली जीवितहानी झाली नसली तरी दोन ते तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.