हिंगोली : हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यात बस आणि कंटेनरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 16 जण जखमी झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतांमध्ये दोन महिला, तीन पुरुष आणि एका चिमुकल्याचा समावेश आहे.. पार्डी मोडातील वळणावर कंटेनरनं खुराणा ट्रॅवल्सच्या बसला धडक दिली.. यात 6 जणांना आपला जीव गमवावा लागलाय.


या अपघातातील जखमींची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.