पुणे : पुण्यात चाकणमध्ये एका खासगी कंपनीच्या बसला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. हा अपघात रात्री साडेदहाच्या सुमाराला पुणे नाशिक मार्गावरील चाकणजवळील मेदनकरवाडी इथे घडला. 


अपघातात राकेश पटेल, नरसिंग साळुंके, नीरजकुमार सिंग यांचा मृत्यू झालाय. एकाची ओळख पटलेली नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांची ने आण करणारी बस नेहमीप्रमाणे मेदनकरवाडी इथे उभी होती. त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकची या बसला धडक बसली. ही धडक एवढी जोरदार होती की चौघांचा जागीच मृत्यू झाला.जखमी झालेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे.