अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात डोंबिवलीतही मोहीम
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही मोहीम उघडण्यात आली आहे. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे.
डोंबिवली : अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात ठाण्यापाठोपाठ आता डोंबिवलीतही मोहीम उघडण्यात आली आहे. मात्र ही मोहीम महापालिकेच्या अधिका-यांनी नव्हे तर सत्ताधारी शिवसेनेनंच उघडली आहे.
शिवसैनिकांनी डोंबिवलीतल्या फेरीवाल्यांना मारहाण केली आहे. या फेरीवाल्यांच्या साहित्याची तोडफोडही करण्यात आलीय. या आंदोलनात युवासेना आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या.
पुन्हा अनधिकृत फेरीवाले आले तर पुन्हा मारहाण करणार असल्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे. अनधिकृत रिक्षावाल्यांविरोधातही यावेळी आंदोलन छेडण्यात आलं. पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनंच राडा केल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेनं प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्त्यांनीच राडा सुरू केलाय. हे कायदा-सुव्यस्थेला खुलं आव्हानच असल्याचं चित्र यातून निर्माण झालं आहे.