अकोला : महापालिका क्षेत्रातील मतदारांना समोर ठेवून उमेदवारांकड़ून हाय-टेक' प्रचार केला जातोय. अकोल्यातही अनेक उमेदवार आपलं प्रमोशन हायटेक पद्धतीनं करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अकोल्याच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भारिप-बहुजन महासंघाच्या उमेदवार अॅडव्होकेट धनश्री देव अभ्यंकर यांचा प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक तीन उच्चशिक्षित आणि मध्यमवर्गीय बहुल असल्यानं त्यांनी हायटेक आणि डिजिटल प्रचाराला पसंती दिली आहे. त्यांच्या प्रत्येक इव्हेन्टचं शुटिंग केलं जातंय. शुटिंगनंतर त्यांच्या प्रभागातल्या महत्त्वाच्या ठिकाणी डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून त्यांचा अजेंडा आणि पाच वर्षांतली कामं मतदारांसमोर मांडली जाणार आहेत. 


अकोला महापालिकेत हद्दवाढीत आजूबाजूच्या 24 गावांचा समावेश झालाय. त्यात न्यू तापडियानगर आणि खरप गावांचा समावेश आहे. या भागाचा आता प्रभाग क्रमांक तीनमध्ये समावेश झालाय. स्थानिकांनी मुलभूत सोयीसुविधा देण्याची मागणी केली आहे. 


निवडणुकीच्या मैदानात प्रत्येक क्षण महत्वाचा असतो हे लक्षात घेत उमेदवारांनी प्रचाराचं युद्ध सुरू केलंय. परंतु अलीकडे तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे प्रचाराचं हे युद्ध 'डिजीटल आणि हायटेक'ही असणार आहे. त्यामुळे पुढचा आठवडा निवडणूक प्रचाराचा हा 'डिजिटल ज्वर' उत्तरोत्तर असाच वाढत जाणार यात कुठलीच शंका नाही.


पाहा व्हिडिओ