नागपूर : नागपूरमध्ये रविवारी ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. यात ४ जण जागीच ठार झाले. पहाटे साडेचारच्या सुमारास खापरीजवळ हा अपघात झाला.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अपघातातील सर्व मृत एकाच कुटुंबातील आहेत. बुटीबोरीहून हे सर्व जण कारनं नागपूरला येत होते. त्यावेळी कार चालकाचं गाडीवरुन नियंत्रण सुटलं आणि कारनं समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकला जोरदार धडक दिली. 


या भीषण अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झालाय.