दाभोलकरांचे मारेकरी सापडले ?
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं आहे.
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी आज सीबीआयनं पुणे आणि पनवेलमध्ये धाडसत्र सुरू केलं आहे. पुण्यात सारंग अकोलकर आणि पनवेलच्या डॉ वीरेंद्रसिंह तावडे यांच्या घरावर छापे घालण्यात आलेत.
तीन वर्षापूर्वी डॉ.दाभोलकर यांची हत्या पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलाजवळ करण्यात आली होती. सध्या हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.
दरम्यान सीबीआयला दाभोलकरांचे मारेकरी मिळाले आहेत, असं ट्विट आपचे नेते आशिष खैतान यांनी केलं आहे. तसंच हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे साधक यांनी दाभोलकरांची हत्या केली असा आरोपही खैतान यांनी केला आहे.