कल्याण : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सकाळी ६.०८ वाजण्याच्या दरम्यान मुंबई - अंबरनाथ लोकलचे पाच डबे रुळावरुन घसल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडी दरम्यान हा अपघात झाला. त्यामुळे कल्याण ते कर्जत वाहतूक पूर्णत: ठप्प आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रवासी मिळेल त्या वाहनाने ऑफिस गाठण्याची मोठी कसरत आहेत. दरम्यान, बदलापूर स्टेशनवर मोठ्याप्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे रुळावरील डबे हटविण्यासाठी किमान आणखी दोन तास लागण्याची शक्यता आहे. कारण मध्य रेल्वेची दुरुस्ती रेल्वे घटनास्थळी पोहोचलेली नाही. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कधी सुरळीत होईल, याचा थांगपत्ता नाही.


घटनास्थळी रेल्वेचा विद्युत खांब कोसळलेला असून ओव्हरहेड वायरही तुटलेली आहे. त्यामुळे या ठिकाणची वाहतूक दिवसभर ठप्प राहण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम जाणवत आहे.