आणि भुजबळांचा अभिनय सत्यात उतरला!
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत. महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच मंत्री असताना कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप भुजबळांवर आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सध्या जेलमध्ये आहेत. मंत्री असताना महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचा आरोप भुजबळांवर आहे.
जेलमध्ये असतानाच भुजबळांच्या मुंबई, नाशिक, अहमदनगरमधल्या मालमत्ता ईडीनं जप्त केल्या आहेत. नाशिकमधील फार्म हाऊसही जप्त झाल्यानं भुजबळ नाशिकमधून बेघर झाल्याची चर्चा आहे.
असं असतानाच भुजबळांचा नटसम्राटमधील गाजलेल्या 'कुणी घर देता का घर'वर केलेला अभिनय व्हायरल होत आहे. खुपते तिथे गुप्ते मालिकेमध्ये छगन भुजबळ आले असताना त्यांनी नटसम्राटमधील हा अभिनय केला होता.
पाहा भुजबळांचा अभिनय