पुणे : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची पाठराखण केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दानवेंची पाठराखण करताना म्हटले आहे, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील म्हणाले, रावसाहेब दानवे यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे. ते कधी शेतकरीविरोधी बोलू शकत नाहीत, आणि राजीनामा मागण हे विरोधकांचं कामच आहे.


दानवे यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी राळ उठवली. राज्यात ठिकठिकाणी विरोधकांनी आंदोलन करत दानवेंविरोधात निदर्शनंही केली. यामुळे दानवेंच्या प्रकरणावर आता सरकारकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न होतोय आहे.


‘तूर खरेदी करूनही रडतात साले’ असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. जालन्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.