चंद्रपूर : महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याची ऑडिओ क्लीप शहरभर व्हायरल झाली. पोलीस आता या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याच्या ऑडिओ क्लीपनं, शहरात एकच खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे पराभूत उमेदवार बलराम डोडाणी यांच्याकडे ही क्लिप सर्वप्रथम आली होती. 


या प्रकरणी पोलिसांनी बलराम डोडाणी यांची चौकशीही केली. आता डोडाणी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून या संपूर्ण प्रकारणाच्या चौकशीची मागणी केलीय. 


दिल्ली असो वा गल्ली ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेबाबत, विरोधी पक्षांनी आधीच रान उठवलं आहे. म्हणूनच त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे.