रत्नागिरी : चिपळूणमध्ये मुस्लिम समाजानं तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. शिक्षण, सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण मिळावे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करून त्याऐवजी समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाला मुस्लिम समाजाने विरोध दर्शवला आहे. तसेच इस्लामी शरीयतमध्ये हस्तक्षेप करण्याच्या सरकारच्या प्रयत्नाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आलं.


 कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता हे धरणे आंदोलन करण्यात आले. जमीअत उल्मा हिंद चिपळूण यांच्या वतीने हे धरणे आंदोलन करण्यात आले.