सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोकणात प्रचाराचा धडाका पाहायला मिळाला. राज्यभर निवडणूक प्रचारात शिवसेना विरुद्ध भाजप सामना रंगला असताना, सिंधुदुर्गातल्या कुडाळ आणि रत्नागिरीतल्या चिपळूण प्रचारसभेत मात्र मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं.


मदरारराजानं त्यांची मतरुपी ठेव दिवाळखोर काँग्रेसच्या बँकेत न ठेवता भाजपच्या बँकेत ठेवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी कुडाळमध्ये केलं. तर चिपळूणमध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या सत्तेची चावी भाजपला देण्याचं आवाहन केलं.