पुणे : कोपर्डीतल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या पीडितेच्या कुटुंबियांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. मुख्यमंत्री स्वतः आज कोपर्डीत आले होते. बारामतीहून मुख्यमंत्री कोपर्डीत दाखल झाले. तिथे त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.


मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते. या प्रकरणात आपण स्वत: लक्ष घालणार असून तुमच्या सर्व मागण्या केल्या आहेत. त्याचप्रमाणे खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून आरोपींना कडक शासन केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.