मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीवाला घोर लागलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक महत्त्वाची घोषणा केलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तूर खरेदीच्या संदर्भात काल केंद्रात बैठक झाली. पंतप्रधान कार्यालयासोबतही बैठक झालीय. त्यानंतर आम्ही असा निर्णय केलाय की जे शेतकरी तूर खरेदी झाली नाहीत म्हणून रांगेत उभे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी राज्य शासन करणार आहे, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय. 


22 तारखेपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांचीच तूर विकत घेण्यात येईल. या मालाला 5050 रुपये प्रति क्विंटल हमी भाव देण्यात येईल. या तूर खरेदीसाठी राज्य शासन १००० कोटी खर्च करणार आहे. 


तूर डाळ केवळ शेतकऱ्यांकडूनच खरेद करण्यात येईल... व्यापाऱ्यांकडून नाही... तूर विकण्यासाठी आलेली व्यक्ती शेतकरी आहे की व्यापारी याचीही खातरजमा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय.