अकोला मनपाच्या हद्दवाढीवर अखेर शिक्कामोर्तब
अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. `ड` वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.
अकोला : अकोला महापालिका हद्दवाढीच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाच्या अधिसूचनेवर स्वाक्षरी केली आहे. 'ड' वर्ग महापालिका गठित केल्यानंतर नियमानुसार तीन वर्षांच्या आत मनपा क्षेत्राची हद्दवाढ करावी लागते. अकोला मनपाची 2001 मध्ये स्थापना झाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांपर्यंत हद्दवाढच झाली नाही. त्यामुळे अकोलेकरांच्या मूलभूत सुविधांवर शहरा नजीकच्या गावांचा ताण पडत होता.
मनपा आयुक्त अजय लहाने यांनी शहरा नजीकच्या 24 गावांचा समावेश असलेला हद्दवाढीचा सुधारित प्रस्ताव सरकारकडे सादर केला होता. या मुद्यावर स्थानिक लोकप्रतिनिधीही कमालीचे सकारात्मक होते. त्यामुळे सरकार स्तरावरदेखील हद्दवाढीच्या हालचालींनी वेग घेतला होता. अखेर बुधवारी हा निर्णय जाहीर झाला. या निर्णयामुळं अकोला शहराच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होणार आहे. महापालिकेची सध्याची 73 सदस्यसंख्या या निर्णयामुळं 85 पर्यंत जाण्याची शक्यता शक्यता आहे.