अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची `कविता`बाजी
पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.
मुंबई : पावसाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं. या संपूर्ण अधिवेशनात भ्रष्टाचार, कोपर्डी बलात्कार, वेगळा विदर्भ आणि महाड दुर्घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
अधिवेशनाच्या शेवटचा दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कविता आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या डायलॉगबाजीमुळे गाजला. मुख्यमंत्र्यांनी कवितेच्या माध्यमातून विखे-पाटलांना चिमटे काढले, तर विखे-पाटलांनी दिवार चित्रपटाचा डायलॉग म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.