रामदेवबाबांच्या दूध प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन
सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
अहमदनगर : सहकाराच्या पंढरीत अर्थात नगर जिल्ह्यात योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाच्या पहिल्या दूध प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
नेवासा तालुक्यातील खडकाफाटा इथं हा प्रकल्प साकारण्यात आलाय. हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असून यात ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून 'पतंजली'नं दूध व्यवसायात पदार्पण केलंय. पतंजली उद्योग समुहाची दूध व्यवसायात तीन लाख कोटींची उलाढाल आहे. शेतकऱ्यांकडून दूध घेऊन त्यापासून तूप आणि इतर दुग्धपदार्थ तयार केले जाणार आहेत.
या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २५० कोटींची गुंतवणूक करण्यात आलीय तर दुसऱ्या टप्प्यात २५० कोटी गुंतवले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्धाटन करण्यात आलं.
देशी गाईचे वाण तयार करण्यासाठी पतंजली आणि महारष्ट्र सरकार यांच्यात करार केला जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.