मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीत दाखवले काळे झेंडे
डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... २७ गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
मुंबई : डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... २७ गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.
काटईनाका इथे निदर्शन करण्यात आली. साहित्य संमेलनाआधी २७ गावांबाबत निर्णय घ्यावा अशी संघर्ष समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मागणी केली होती. पण ही मागणी अजुनही पूर्ण झालेली नाही. स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी 27 गावांचा मुद्दा साहित्य सम्मेलनाच्या भाषणात मांडला.
साहित्य सम्मेलन हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी हा 27 गावांचा मुद्दा हा महत्त्वाचा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा असंही गुलाब वझे यांनी सांगितलं..