नाशिक : थंडीमुळे द्राक्ष उत्पादनाच्या प्रतीवर परिणाम होऊन निर्यातक्षम द्राक्षमालाचे नुकसान होत आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाणी देणे, पहाटे ओल्या पालापाचोळ्याचा धुर करीत शेकोटी करण्याचे उपाय करण्याच्या सूचना कृषी संशोधकांनी केल्या आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन वर्षाची सुरुवात द्राक्ष उत्पादकांची चांगलीच कसोटी पाहतोय. थंडीचा घसरत चाललेला पारा आता 5 अंशांपर्यत खाली आलाय. गहू पिकाला थंडी चांगलीच मानवते. निफाडसह परिसरामध्ये गहू पिकाखालील क्षेत्र भरपूर प्रमाणात आहे. सध्या थंडीचे प्रमाण चांगले राहील्याने गहू पिक जोमदार अवस्थेत उभे राहीलेले आहे.


गव्हा बरोबरीने हरबरा, रब्बी कांदा या पिकालाही थंडीचा चांगलाच फायदा होतोय. मात्र वाढलेल्या थंडीमुळे द्राक्ष उत्पादनाच्या प्रतिवर परिणाम होऊन निर्यातक्षम द्राक्षमालाचे नुकसान होत आहे. द्राक्ष बागा वाचवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी पाणी देणे, पहाटे ओल्या पालापाचोळ्याचा धुर करीत शेकोटी करण्याचे उपाय करण्याच्या सूचना कृषी संशोधकांनी केल्या आहे. 


दरम्यान, नाशिक शहरात आज  तापमानाचा पारा सहा अंशावर आला आहे तर जिल्ह्यात पाच अंशापर्यंत नोंद झाली आहे त्यामुळे शहरात पहाटेपासून धुक्याची दुलई पसरली होती.  गोदावरी काठावर असलेल्या नवश्या गणपती परिसरात जणू काही ढग खाली आले होते. जॉगर्सने या धुक्याचा मनमुराद आनंद लुटला.


प्रवाहात कनयोकिंग खेळाच्या सराव करणाऱ्या खेळाडूंना धुक्याने  चांगलेच वेढले होते. गंगापूर रस्त्यावरून ते थेट धरणापर्यंत धुक्याचा अंमल असल्याने नाशिकचे हिल स्टेशन झाले होते..बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पाट्यांमुळे गेल्या चोवीस तासात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.