लग्नाचं आमिष आणि फसवणूक करुन तरुणीला पळवलं
वागळे इस्टेट येथील जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे याला वागळे इस्टेड पोलिसांनी अटक केली आहे. २५ दिवसांनी मुलगी सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलंय.
ठाणे : वागळे इस्टेट येथील जुनागाव भागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळसी येथे पळवून नेणाऱ्या पवन उर्फ अमोल मुकींदा आवटे याला वागळे इस्टेड पोलिसांनी अटक केली आहे. २५ दिवसांनी मुलगी सुखरुप मिळाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलंय.
तरुण हा वेगवेगळ्या खासगी गाड्यांवर ड्राईव्हर होता. वेगवेगळ्या गाड्या घेऊन तो महाविद्यालयाच्या जवळ तरुणींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा. अशाच एका तरुणीला त्याने फसवलं आणि पळवून नेलं.
तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. २५ दिवसानंतर ही तरुणी तिच्या आई-वडिलांकडे सुखरुप आली. पण अशा भामट्या आणि फसवणूक करुन मुलींना लग्नाचं आमिष दाखवणाऱ्या तरुणांपासून सावध राहण्याची गरज आहे.