नाशिक : निवडणुका म्हटल्यावर तिकीट वाटपात कोणावर तरी अन्याय होतोच. मग असंतुष्टांकडून आखली जाते अधिकृत उमेदवारांना पाडण्याची रणनिती. अशी परिस्थिती नाशिक मनपा निवडणुकीत अनेक प्रभागात निर्माण झाली आहे. 122 जागांसाठी 821 उमेदवार नशिब आजमावत आहेत. त्यात तीनशेहून अधिक अपक्ष आहेत. यात पंधरा ते वीस माजी नगरसेवकांचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही राजकीय पक्षांनी अपक्षांशी हातमिळवणी करून मैदानात बाजी मारण्याची तयारी केली आहे. तिकीट वाटपात शेवटपर्यंत गोंधळ घातल्याने शिवसेनेसारख्या पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज बाद होत असल्याने त्यांना पुरस्कृत करण्याची नामुष्की पक्षावर ओढवते. तर गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ राहुनही अन्याय झालेल्या अनेकांनी माझं काय चुकलं ही टॅगलाईन फडकावून बंडखोरीचं निशाण फडकावलंय.


तिकीट वाटपाचा बाजार आणि त्यातून सुरू झालेली धुसफूस शमण्यात राजकीय पक्षांना पूर्णपणे यश आलेलं नाही. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी मोट बांधून स्वतंत्र पॅनलतीही निर्मिती केली आहे. नाशिक महापालिकेत कुठल्या पक्षाला बहुमत मिळेल हे सांगणं कठीण आहे. त्यातच मावळत्या सभागृहात अपक्षांच्या जोरावरच मनसेनं आपला झेंडा 5 वर्षे कायम राखला. या निवडणुकीतही शेकडो नगरसेवक आपलं नशीब आजमावत आहेत. त्यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके विजयी होणार यात शंकाच नाही. पण नाशिककरांनी त्रिशंकू कल दिला तर मात्र मागच्या वेळप्रमाणेत अपक्षही भाव खाऊन जाणार यात शंकाच नाही.