कल्याण : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतानं केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चा बदला आम्ही घेणार... सर्जिकल स्ट्राईकची किंमत भारताला चुकवावीच लागेल... अशी धमकी मिळाल्याची तक्रार कल्याणमधील महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं नोंदवलीय.


इसिसचं जाळं...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी आम्ही आता भारतात सणांच्या काळात मोठा घातपात घडवणार' अशी धमकी फोनवरुन आयसीसीस या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्याने दिल्याची माहिती या व्यक्तीनं दिलीय.  


कल्याण तरुण इसिसच्या जाळ्यात अडकल्याचं समोर आल्यानंतर देशभरातील किती मुस्लीम तरूण 'इसिस' या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा तपास सुरु झाला... आणि त्यातूनच धक्कादायक माहिती समोर येत गेली. 


यंदाच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील 'अल्पसंख्यांक वेल्फर कमिटी' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परवेज अली सय्यद यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्राद्वारे आपल्याला मिळालेल्या धमकीची माहिती दिलीय. 


'इसिस' या दहशतवादी संघटनेतील हाशिम नामक एका सक्रीय कार्यकर्त्याने धमकीचा कॉल केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या दिवाळीत घातपात घडविण्यात येणार आहे. यासंदर्भात परवेज आली सय्यद यांनी सर्व तपास यंत्रणांना कळविले आहे.


राजनाथ सिंह यांना पत्र लिहून कळविली माहिती 

कुठून आला तो कॉल?


धक्कादायक म्हणजे, साधी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ही परवेज यांना अफ्गानिस्तान येथून घातपात घडवण्या संबंधी धमकीचा फोन आला होता. पण काल म्हणजे २६ ऑक्टोबर रोजी परवेज यांना जो धमकीचा फोन आला होता तो मुंबईचा नंबर होता. पण, धमकी देणारी व्यक्ती ही सिरीयातील लोकं उर्दु बोलतात त्याप्रमाणे बोलत होती. याचा अर्थ एकतर धमकी देणारी व्यक्ती ही मुंबईत दाखल झालीय किंवा त्याने मुंबईतला नंबर क्रॉस करुन नेटचा वापर करुन हा धमकीचा फोन केला असावा, असा संशय पोलिसांना आहे.


तक्रार किती खरी?


दरम्यान, परवेज आली सय्यद यांना आलेला धमकीचा कॉल किती खरा आहे. हे तपासानंतर समोर येणार असून स्थानिक पोलीस यंत्रणेसह इतरही यंत्रणा तपास कामाला लागल्याचे दिसून आले आहे. परवेज ही तीच व्यक्ती आहे ज्यांनी सर्वात आधी कल्याणचे चार तरुण सिरिया येथे आयसीस या दहशतवादी संघटनेत शामिल होण्यास गेल्याची माहिती पोलिसांना दिली होती.