लातूर : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एटीएममध्ये कॅश नसल्यामुळे आक्रमक होऊन रवींद्र गायकवाड स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांना घेऊन आंदोलन करू लागले. यावेळी त्यांनी एसबीआयच्या बँक अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मात्र शिवसैनिक आक्रमक होऊन बँक अधिकाऱ्यांना धक्का-बुक्की करू लागल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. त्यावेळी खासदार रवींद्र गायकवाड यांनी पोलिसांशीच हुज्जत घालीत दबंगगिरी सुरु केली. 


पोलिसांना अरेरावीची भाषा करीत गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे आणि पोलीस उपनिरीक्षक सत्यवान हाके यांच्यावर चांगलेच भडकले. यावेळी तुम्हाला बघून घेतो अशी धमकीही त्यांनी पोलिसांना दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत होते.