पुणे : पुण्यामधल्या धरणक्षेत्रामध्ये मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीकपात सोमवार पासून रद्द करण्यात येणार असल्याची घोषणा महापौर प्रशांत जगताप यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापौरांच्या या घोषणेला 24 तास उलटत नाहीत, तोच या पाणी कपात रद्द करण्याच्या निर्णयावरून गोंधळ सुरु झाला आहे. एवढ्यात पुण्यातली पाणीकपात रद्द करणं शक्य नसल्याचं पुण्याचे आयुक्त कुणालकुमार म्हणाले आहेत. 


महापौर आणि आयुक्तांच्या या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे पुणेकरांमधला संभ्रम वाढला आहे.