सांगली : काळा पैशासंदर्भात केंद्रातील पंतप्रधान मोदी सरकारने घेतलेल्या धोरणांवर तसेच राज्यातील कारभारावर काँग्रेसने सडकून टीका केली. सहकार चळवळच मोडीत काढली गेली तर त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसेल, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष समारोह शुभारंभ सांगलीत पार पडला. या कार्यक्रमाला राज्य आणि देशातील काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, शिवराज पाटील-चाकूरकर, पतंगराव कदम आदी नेते उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी काँग्रेस नेत्यांनी जोरदार मोदी सरकारवर हल्लाबोल केला.


कोत्या मनाने राज्य चालवता येत नाही, अशी कोपरखळी मारली विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मारली. तर वसंतदादांनी आणलेली पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना आता राज्यसरकार पैसे अडवा आणि विरोधकांची जिरवा अशा पध्दतीने राबवत असल्याची टीका नारायण राणे यांनी केली.