ठाणे महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते नारायण राणे आणि राष्ट्रवादीचे ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
ठाणे महापालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झालेली असली तरी इतर महापालिकांमध्येही आघाडी होणार का दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढणार हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.