लोकांच्या सहानुभूतीसाठी काँग्रेसचा आक्रोश मोर्चा
नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
सोलापूर : नोटाबंदी आणि पैसे काढण्यासाठी रांगेत थांबलेल्या ५० लोकांना जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या बाजूने सहानुभूती दर्शवण्यासाठी काँग्रेस तर्फे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.
मोर्चा संपवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्व कार्यकर्ते गेले असता. त्यांना ताटकळत ठेवले त्यामुळे वैतागलेल्या महापौरांनी थेट दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. त्यामुळे जिल्हाधिकारी वैतागून बाहेर आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी यांच्यात बाचाबाची झाली मात्र जिल्हाधिकाऱयांनी शांततेत घेऊन यावर पडदा टाकला.