घोडबंदर रोडवर अॅसिड घेऊन जाणारा कंटेनर उलटला
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्यावर आज सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिडचा एक कंटनेर उलटलाय.
ठाणे : ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्यावर आज सकाळी हायड्रोक्लोरिक अॅसिडचा एक कंटनेर उलटलाय.
कंटेनर उलटल्यानं त्यातल्या 200 लीटर अॅसिडच्या ड्रमला गळती लागलीय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हायड्रो क्लोरिक अॅसिड हे विषारी आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अपघाताच्या स्थानापासून जवळच असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.
दरम्यान घोडबंदर रोडवरची वाहतूक सामान्य आहे.