कोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या उमेदवारीवरून आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतला संघर्ष टोकाला पोहचलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सदाभाऊंनी घराणेशाही आणल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय... सागर खोत यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या वादामुळं स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.


सदाभाऊंनी मंत्रीमंडळातून बाहेर पडावं का याबाबत कार्यकारिणी निर्णय घेणार असल्याचं शेट्टींनी सांगितलंय. त्यामुळं सदाभाऊ स्वाभिमानीतच राहणार की भाजपचा रस्ता धरणार याची उत्सुकता सर्वांना लागलीय. दरम्यान, मुलाचं पुनर्वसन करण्यासाठी राजकारणात आलेलो नाही, असं प्रत्युत्तर खोतांनी दिलं आहे.