नाशिक : कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातोय हे नाशिक जिल्ह्ल्यातल्या सटाणा आणि गोंदियामध्ये समोर आले आहे.  सटाणा तालुक्यातलं नामपूर केंद्र कॉपी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नामपूरमध्ये पहिल्याच पेपरला कॉपी पुरवल्य़ाचं समोर आले आहे. कॉपी पुरवण्यासाठी नातेवाईक आणि पालकांची भलीमोठी गर्दी केंद्राबाहेर दिसली. पोलिसांचं अपुरं संख्याबळही याला कारणीभूत ठरले आहे. पोलिसांना गुंगारा देत मुलांना कॉपी पुरवल्या गेल्यात. 


जीव धोक्यात घालून कॉपी पुरवल्या जात असल्याचंही दिसले. संरक्षण भींतीवर तर कधी दुस-या मजल्यावर चढूनही खिडकीतून कॉपी पुरवल्या गेल्यात. अशी जीवाची बाजी लावून मुलांपर्यंत उत्तरं पोहोचवली जात होती.  तर तिकडे गोंदियामध्ये दहावीच्या परीक्षेत शिक्षकच कॉपी पुरवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.