न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबईत अटक
चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
नवी मुंबई : चक्क न्यायालयाची फसवणूक करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
दिवाकर ब्रिजशकिशोर जयस्वाल असं या टोळीच्या म्होरक्याचं नाव आहे. विविध गुन्ह्यांमध्ये अटकेत असलेल्या आरोपींना सोडवण्यासाठी लागणारी बनावट कागदपत्रं, तसंच बनावट जामिनदार ही टोळी तयार करुन द्यायची.
या टोळीने सुमारे 500 हून अधिक न्यायालयीन प्रकरणांमध्ये, बनावट कागदत्रांच्या आधारे बोगस जामिनदार उभे केले असण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या टोळीकडून विविध व्यक्तींच्या नावांची बनावट वीज देयकं, बँकेची बनावट पासबुकं, 15 बनावट आधारकार्ड, 5 बनावट पे-स्लीप, निवडणूक आयोगाची 48 बनवाट ओळखपत्रं, 6 बनावट रेशन कार्ड आणि इतरही दस्तावेज जप्त करण्यात आला आहे.