नाशिक : मैत्रैय फसवणूक प्रकरणी जिल्हा न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिला आहे. गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयानं दिले आहेत. 


फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांतच जिल्हा न्यायालयानं अशाप्रकारे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात 125 गुंतवणूकदारांना व्याजासह पैसे परत मिळणार आहेत. मैत्रेय ग्रुपमध्ये 27 लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून तब्बल 1400 कोटींचा घोटाळा झाला आहे.