पुणे : पुण्यातील भाजपच्या उमेदवारीवरून निर्माण झालेला वाद आता प्रदेश पातळीवर पोचलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच आता पुण्याची यादी निश्चित करणार आहेत. त्यासाठी आज संध्याकाळी मुंबईत वर्षावर बैठक होणार असल्याची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युती तुटल्यानंतर पुण्यात भाजपच्या ७० उमेदवारांची यादी तयार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र या यादीतील नावांवरून पक्षांतर्गत वाद उफाळून आलाय. या यादीमध्ये अनेक विद्यमानांना डावलल्यात आलंय. त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांनी त्यांच्याच कार्यकर्त्यांची वर्णी लावल्याचं कळतय. 


त्यामुळे शहरातील पदाधिकारी नाराज आहेत. त्याशिवाय बाहेरून आलेल्या काहिंना उमेदवारी देण्यात आलीय, तर काहिंना आश्वासन देऊन वेटींगवर ठेवण्यात आलंय. अशा परिस्थितीत भाजपची यादी रखडलीय. त्यामुळे आता स्वत: मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षच हा वाद मिटवणार आहेत. ते फायनल करतील ती यादी पक्षातर्फे उद्यापर्यंत जाहिर केली जाण्याची शक्यता आहे.