प्रणव पोळेकर, रत्नागिरी : नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताला देशात सर्वात जास्त पसंती गोव्याला दिली जाते. पण कोकणातलेही एमटीडीसीचे रिसॉर्ट्स जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हाऊसफुल्ल झालेत. नोटाबंदीचा परिणाम मात्र यावर झालेला दिसत नाही हे विशेष...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलग सुट्ट्या आल्या की पर्यटकांची पावलं वळतात कोकणाकडे... नववर्षाच्या स्वागताला गोव्याला जरी पसंती दिली जात असली तरी कोकणही यात मागे नाही. त्यामुळेच कोकणातले किनारे आणि एमटीडीसीची रिसॉर्ट्स पर्यटकांनी हाऊसफुल्ल झालेत. दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई आणि पुण्यातून कोकणात पर्यटक दाखल झालेत.


720 किमीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा कोकणाला लाभलाय. त्यामुळे पर्यटक फिरण्यासाठी जवळचं ठिकाण म्हणून कोकणाकडे वळतात. त्यातल्या त्यात गणपतीपुळे, वेळणेश्वर, तारकर्लीला पर्यटक विशेष पसंती देताना दिसत आहेत. तर स्वच्छ समुद्र किनारा आणि गणपत्ती बाप्पाचं दर्शन यामुळेच गणपतीपुळेला विशेष पसंती दिली जाते. 


नोटाबंदीचा परिणाम पर्यटनावर होईल असं वाटत होतं पण पर्यटकांनी सुट्टे पैसे जवळ बाळगल्यानं फारसा परिणाम झालेला नाही. नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात दाखल झाल्यानं एमटीडीसीची सर्व रिसॉर्टस जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आरक्षित झालीत. 


नववर्षाच्या स्वागताला कुणी परदेशआत जातं तर कुणी गोव्याला पसंती देतं पण त्याच तोडीचं कोकणंही यात आता मागे राहिलेलं नाही.