नवी मुंबई : नेरुळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करुन हॉस्पिटल बंद करण्याच्या नवी मुंबई पालिकेच्या नोटीशीला स्थगिती देण्यात आली आहे. पालिकेच्या या कारवाईला नगरविकास खात्याने स्थगिती दिलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रूग्णालयाला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची एनओसी नसल्याचे कारण देत पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही कारवाई केली होती. बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टनुसार कारवाई करीत नेरूळ पोलीस ठाण्यात हॉस्पिटलविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मनपाच्या प्रथम संदर्भ रुग्णालयाच्या 26 हजार चौरस फुट जागेवर हिरानंदानी समूहाला भाडे तत्वावर जागा देण्यात अली होती. 


या जागेवर हिरांदानी समूहाने परस्पर फोर्टिस या रुग्णालयाशी करार करून या रुग्णालयाला ही जागा वापरण्यास दिली होती. पालिका आणि सिडकोला अंधारात ठेवून परस्पर हिरानंदानी रूग्णालय प्रशासनाने परस्पर फोर्टीज हॉस्पिटलबरोबर करार करीत त्यांना पालिकेची जागा दिली. अखेर हिरांदानी रुग्णालयाला तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करत करारपत्रातील अटींचा भंग केल्याचा ठपका ठेवून  कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.