दाभोलकर हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रुद्र पाटील आणि वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तावडेची पत्नी निधी तावडे यांनी केला आहे.
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रुद्र पाटील आणि वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट तावडेची पत्नी निधी तावडे यांनी केला आहे.
निधी तावडे दोन दिवसांपूर्वीच परदेशातून भारतात आल्या आहेत. दाभोलकर आणि गोविंद पानसरेंच्या हत्येप्रकरणी तिची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे.
दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येआधी तावडे आणि सारंग आकोलकर यांच्यात झालेल्या ईमेल संवादाबद्दल माहिती असल्याचं निधी यांनी कबुल केले आहे. पण हे दोघे खुनाचा कट रचत असावेत, असं वाटलं नसल्याचं निधी यांनी म्हटले आहे.
याशिवाय वीरेंद्र तावडेच्या बाईकसाठी सीबीआय ठिकठिकाणी छापे घालत आहे. दरम्यान, दाभोलकर हत्येच्या तपासाचा स्टेटस रिपोर्ट आज सीबीआयला मुंबई हायकोर्टासमोर सादर करायचा आहे.