ठाणे : ठाणे जवळ खारेगांव टोल नाका - माणकोली - भिवंडी नाका या मार्गावर दररोजच्या भयानक अशा वाहतूक कोंडीने वाहनचालक आणि प्रवासी हैराण झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वाहतूक कोंडीचा फटका गुरूवारी ग्राम विकास राज्यमंत्री दादा भूसे यांनाही बसला. अखेर वैतागून दादा भुसेंनी खारेगांव टोल नाका ते माणकोली अंतर पायी चालत जाणे पसंत केले. 


विशेष म्हणजे राज्यमंत्री याच्या गाडीने वाहतूक कोंडीमधून वाट काढल्यानंतरही माणकोली येईपर्यन्त गाडीमध्ये बसण्यास भूसे यांनी नकार दिला. या परिस्थितीबद्दल संबंधित जिल्हाधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी यांना जाब राज्यमंत्री भूसे यांनी विचारला.


सध्या वर्सोवा इथे पुलाचे काम सुरु असल्याने या मार्गावरील जड़ वाहतूक ही खारेगांव - माणकोली मार्गावर आली आहे. त्यातच माणकोली इथे उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरु असल्याने या मार्गावरील वाहतूक दररोज मूंगीच्या गतीने जात आहे. याचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच नाशिककडे निघालेल्या राज्यमंत्री भूसे यांनाही सहन करावा लागला.