मुंबई : ज्या समाजातील लोकांना एके काळी पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारला गेला त्याच समाजातील एका उद्योजकाने बाबासाहेबांना मानवंदना म्हणून '२० मार्च' नावाचा पाण्याचा ब्रँड सुरू केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविचल धिवार हे पुण्यातील उद्योगपती असून त्यांनी रविवारी हा ब्रँड लाँच केला आहे. या पाण्याच्या बाटलीची किंमत किती असेल हे मात्र अजून समजलेले नाही. दलितांना पाण्याचा हक्क नाकारणाऱ्या समाजाविरुद्ध बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाडच्या चवदार तळ्याला सत्याग्रह केला आणि सर्वांना पाण्याचा हक्क मिळवून दिला.



 


'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या बाबासाहेबांच्या हाकेला दिलेली ही खरी साद आहे. एके काळी दलितांना पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारणाऱ्या समाजातील आजचा एक उद्योजक इतरांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय करतो ही समाजासाठी एक अभिमानाची बाब म्हणायला हवी.