पुणे : मुंजीचा सोहळा म्हटला की थाटमाट आलाच. पुण्यातील एका मुंजीची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. योगेश आणि नूतन शेट्ये यांची मुलगी मिहीका हा मुंजसोहळा पुण्यात चर्चेचा विषय ठरला होता.... मुलांची सर्रास मुंज होते.... मग मुलीचीही मुंज करावी, तिचं सगळं कोडकौतुक करावं, या हेतूनं लेकीची मुंज केल्याचं आई वडील सांगतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धार्मिक ग्रंथांनुसार मुंज हा एक संस्कार मानला जातो... त्यानुसार या सोहळ्यामध्ये प्रत्येक विधीचा अर्थ सांगितला जात होता.... एखादी इव्हेंट असावी, अशा पद्धतीनं या बटू कन्येच्या मुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं.


या सगळ्या थाटमाटानं आणि कोडकौतुकानं बटूकन्याही भलतीच खूष होती. मुलींची मुंज अगदी सर्रास होत नसली, तरी काही ठिकाणी मुलींची मुंजही केली जाते.... पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुंजीचं आयोजन करुन हा एक नवा पायंडा सुरू करण्यात आल्याचं आयोजक सांगतात. पुण्यातल्या खाऊवाले पाटणकरचे रमेश पाटणकर यांनी हा मुंजीचा सोहळा आयोजित करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली. 


या समारंभाला उपस्थित असलेल्यांनीही या सोहळ्याचं भरभरुन कौतुक केलं..... नातेवाईकांनाही एक वेगळा आणि देखणा सोहळा पाहिल्याचं समाधान मिळालं.


मुळात मुलाची किंवा मुलीची मुंज करावी की नाही, हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे... पुण्यातही या आधी मुलींच्या मुंजी झाल्यायत.... आजही होतात..... त्यात नवं असं काहीच नाही.... पण मिहीकाच्या मुंजीचा थाटमाट दिमाखदार होता.... म्हणून त्याची एवढी चर्चा झाली..... शेवटी ही ज्याची त्याची हौसमौज....