कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी रायगडवर ढोल वाजवल्यानंतर राज्यभरातून सरकारविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. दरम्यान, मंत्री विनोद तावडे यांना इशारा देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरात शिवभक्तांनी सरकारचा निषेध करत विनोद तावडे आणि मुख्यमंत्र्यांविरोधात शिवाजी चौकात जोरदार निदर्शन केली. यावेळी विनोद तावडेंना कोल्हापुरात प्रवेश करु देणार नसल्याचा इशारा स्वाभिमान संघटनेनं दिलाय.


त्याच बरोबर जर विनोद तावडे कोल्हापुरात आले तर त्यांच्या कोल्हापुरी हिसका दाखवून स्वागत केलं जाईल असाही इशारा स्वाभिमान संघटनेनं दिला आहे.