महाड दुर्घटनेतील मृतदेह समुद्रात गेले वाहून ?
महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.
रायगड : महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.
जयगड-मुंबई एसटीबसचे चालक एस.एस.कांबळे यांचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले समुद्र किना-यावर सापडला. हा किनारा घटनास्थळापासून ७० किमी अंतरावर आहे.
दुसरा मृतदेह हरीहरेश्वर येथील समुद्र किना-यावर सापडला. हा किनारा घटनास्थळापासून ८९ किमी अंतरावर आहे. तिसरा मृतदेह महाड जवळच्या केंबुर्ली गावाजवळच्या समुद्रात सापडला. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. त्यामुळे मृतदेह हे समुद्रात वाहून गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.