गुटख्याची पिचकारी मारली विद्युत वाहिनीवर, गेला जीव
गुटखा हा आरोग्यासाठी अपायकारक असतो हे आपल्या माहिती आहे. पण त्या गुटख्याच्या सवयीने एकाला एका `झटक्यात` मृत्यूच्या दारात नेले.
मालेगाव : गुटखा हा आरोग्यासाठी अपायकारक असतो हे आपल्या माहिती आहे. पण त्या गुटख्याच्या सवयीने एकाला एका 'झटक्यात' मृत्यूच्या दारात नेले.
तोडांतील पिचकाररी उच्च विद्युत वाहिनीवर मारली आणि त्याचा शॉक बसून मालेगावातील तरूणाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
शॉक बसून तरूणाचा जागीच मृत्यू झाला. मोहमंद यासिन सलीम असे या २१ वर्षीय तरूणाचे नाव आहे. अब्दुल खालिक पार्क येथील हुरमतबी मशिदीशेजारी त्याचा भाऊ मोहंमद अमिन याला भेटायला गेला होता.
मोहंमद अमिन हा गफर अब्दुल हनिफ हुसैन यांच्या कापड कारखान्यात कपड्यांवर रंगकाम करतो. दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम सुरू असताना मोहंमद यासिन याने तोंडातील गुटख्याची पिचकारी बाहेर फेकली. या इमारतीच्या जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर पिचकारी पडल्याने यासिन विद्युत दाबाच्या दिशेने खेचला गेला. यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.