नवी मुंबई : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एम ७ या ठिकाणी असलेल्या गौशिया कोल्ड स्टोरेजच्या कारखान्यात तीन कामगारांचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात केली आहे. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारे कोल्ड स्टोरेज मध्ये एका टाकीजवळ काम सुरु असताना अचानक विद्युत गळती झाली. यामध्ये ती कामगारांना शॉक लागला.


त्यात कन्हय्या परशुराम महतो (२२), रहीम मदार गाजी (३८),  मनोज बिसो मूडा( २६) यांना विजेचा धक्का लागून टाकीत पडून मृत्यू झालेला आहे. दरम्यान या प्रकरणी कंपनी व्यवस्थापन विरोधात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.