चंद्रपूर : आलिशान गाडीतून फिरुन 'संघर्ष यात्रा' काढणाऱ्या विरोधकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली आहे. बॅंकेतील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी विरोधकांना कर्ज माफी हवेय, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केवळ यात्रेचं नाव संघर्ष असं देऊन काहीही होत नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर टीका केली आहे. आलिशान मर्सिडीज गाड्यांमधील नेते खाली उतरायला तयार नाहीत. त्यामुळे ही यात्रा संघर्ष यात्रा नसून मर्सिडीज यात्रा असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलाय.


तर विरोधक त्यांच्या बॅकांमधील काळ्या कारभारावर पांघरुण घालण्यासाठी कर्जमाफीची मागणी करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय. ते चंद्रपूरमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते.