पांडुरंगाची अशीही अनोखी सेवा
अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी... वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...!
कैलास पुरी, पिंपरी-चिंचवड : अवघ्या महाराष्ट्रांच सांस्कृतिक वैभव म्हणजे वारी... वारीचा श्वास म्हणजे त्यात सहभागी होणारा वारकरी... पांढर धोतरं, पंढरा शर्ट हा त्यांचा पेहराव... हे स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान केल्या शिवाय टाळ मृदूंग पखवाज हातात घेऊ शकत नाही... त्याच मूळ वस्त्रांना विशेष महत्व आहे... आणि देहू मध्ये ही वस्त्र शिवतात डोंबे... गेली कित्येक वर्ष देहूत येणारा वारकरी इथंच वस्त्रे शिवतो...!
पांढरी वस्त्र, पांढरा सदरा ही वारकऱ्यांची ओळख... वारीमध्ये सहभागी होणारा वैष्णव भक्त काही नियमांचं ही पालन करतो. वारकरी संप्रदायातील वारकरी शुभ्र पांढरे कपडे परिधान केल्याशिवाय टाळ, मृदुंग, पखवाज हातात घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे दिंडीमध्ये देखील सामील होऊ शकत नाही. पालखी प्रस्थानासाठी देहू मधे येणारा प्रत्येक वारकरी हा देहू मधील प्रसिद्ध डोंबे या शिंप्याकडेच आपले कपडे शिवत असतो.
दिंडीमध्ये दाखल होणारा वारकरी जेंव्हा आम्ही तयार केलेले कपडे परिधान करतो तेंव्हा पांडूरंगाला भेटल्याचा अनुभव आम्हाला येतो अशी भावना डोंबे यांनी व्यक्त केली. वारी सुरु होण्याच्या 2 महीने आधीपासून आमची ही लगबग सुरु होते. तसेच इतर महाराष्ट्रातून दाखल झालेल्या वारकऱ्याला पालखी प्रस्थानापूर्वी कपड़े शिवून देण्याचं आव्हान आमच्या समोर असतं. दिवसाला किमान 25 ते 30 जोड़ी कपड़े वारी काळात शिवले जातात. मागील सहा ते सात वर्षापासून डोंबे यांची ही सेवा अखंडीतपणे सुरु आहे.
वास्तविक पाहता डोंबे यांचा हा व्यवसाय आहे. पण वारीमध्ये वारकऱ्यांसाठी कपडे शिवणे ही एक प्रकारे पांडुरंगाची सेवाच असल्याची भावना त्यांची आहे. वारीमध्ये प्रत्येकाला सहभागी होता येईल असं नसतं. पण वारकऱ्यांची सेवा या ना त्या प्रकारे केली तर ती सेवा पांडुरंगाची सेवा होईल अशी भावना प्रत्येकजान व्यक्त करतो...! त्याच मूळ डोंबे ही व्यवसायातून ही सेवा साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
पाहा व्हिडिओ